माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाचे विद्यार्थी,वनविहार व वर्षासहलीत रंगले

माणगाव वार्ता.माणगांव -निसर्ग हा गुरू आहे.पावसाळ्यातील दिवसात हा निसर्ग अगदी भरभरून ज्ञान देत असतो .विद्यार्थ्यांना निसर्गाचा सहवास लाभावा ,निसर्गाची ओळख व्हावी या उद्देशाने छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात वनविहार व वर्षासहलीचे आयोजन शुक्रवार दि.7 ऑगस्ट रोजी निळज गाव परिसरात करण्यात आले होते.विद्यालयाच्या पंचक्रोशीतील निळज गावातील माळरानावर सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विध्यार्थ्यांणी मनमुराद निसर्गाचा आनंद घेतला.निळज गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात व मालरानावरील संतोषी माता मंदिरात आरती करून वनविहारास सुरुवात झाली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी नवीन होणाऱ्या एमआयडीसी परिसर,धरण परिसर ,ओहोळ व विविध झुडपांचे निरीक्षण केले.विविध पानांचे आकार, रंग तसेच पावसाळ्यातील दिवसात उगवणारी फुले यांचे निरीक्षण केले.काही विध्यार्थ्यांणी या फुलांपासून सुंदर पुष्पगुच्छ बनविले.पावसाच्या सरी व वाहणाऱ्या ओहोळामधून मनसोक्त हिंडत विध्यार्थ्यांणी वनविहाराचा तसेच माळरानावर मनसोक्त खोखो, कबड्डी, फुटबॉल खेळाचा मनमुराद आनंद घेतला. निळज गावातील ग्रामस्थानी सर्व विध्यार्थ्यांसाठी सुग्रास अशा भोजनाची व्यवस्था केली होती.माळरानावर भोजनानंतर ग्रामस्थ परिचय संवाद घडून आला.मुख्याध्यापक संतोष कदम यांनी निसर्ग का पहायचे हे सांगून विध्यार्थ्याना निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले . सहल प्रमुख शिक्षक भिवा पवार यांनी वर्षा सहलीचे सुंदर असे नियोजन केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , शाळेतील विविध समित्यांचे पदाधिकारी ,सदस्य, निळज ग्रामस्थ यांनी उत्तम सहकार्य केले. सर्वांचे आभार व्यक्त करत वनविहाराचा समारोप झाला.मालरानावर मनसोक्त विहार व भोजन यामुळे विध्यार्थी अतिशय आनंदीत झाले व संस्मरणीय असा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

