
: अजित शेडगे | दि. 21 जुलैग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने हरीओम चॅरिटेबल असोसिएशन, मुंबई, श्रीमती वालीबेन जेठालाल छेडा आणि परिवार, मुंबई तसेच रायगड भूषण श्री कृष्णाजी महाडिक यांच्या सहकार्याने अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत चपला व वह्यांचे वाटप करण्यात आले.शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांच्या हातात शालोपयोगी साहित्य आणि जीवनोपयोगी वस्तू पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.विविध शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये हरीओम चॅरिटेबलअसोसिएशनचे अध्यक्ष विजयराज नागरथ, रायगड भूषण श्री कृष्णाजी महाडिक, कुणालजी, सनीजी, धनजीभाई , शिक्षक विनोद लाड शाळेचे मुख्याध्यापक भरत काळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ विविध, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रायगड भूषण श्री कृष्णाजी महाडिक म्हणाले,”आज तुम्हाला मिळालेली मदत ही केवळ चपला आणि वह्यांची नाही, तर समाजाचा तुमच्यावरील विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे, खूप शिकून मोठे व्हावे आणि भविष्यात समाजाचे ऋण फेडणारे जबाबदार नागरिक बनावे. शिक्षणाच्या बळावर स्वतःचे, कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा.”यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले.या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी हरीओम चॅरिटेबल असोसिएशन, श्रीमती वालीबेन जेठालाल छेडा परिवार आणि रायगड भूषण श्री कृष्णाजी महाडिक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून कौतुक व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
